कन्नड घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली!

---Advertisement---

 

जळगाव : कन्नड घाट परिसरासह चाळीसगाव तालुक्यातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून यामुळे कन्नड घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रस्त्यावर मोठे दगड व माती आल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगावनजीक कन्नड घाट असून हा मार्ग दक्षिण-उत्तर जोडला गेला आहे. अति पावसामुळे घाटात दरडी कोसळत असतात. गेल्या दोन वर्षापासून घाटातील अवजड वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे.

प्रवासी वाहनांची वाहतुक येथून सुरु असते. बुधवारी चाळीसगावकडून पुढे जाणाऱ्या घाटाच्या पहिल्या वळणावरील दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठे दगड व माती साचली होती. यामुळे काहीकाळ दोन्ही बाजूंकडील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

यानंतर राष्ट्रीय महामार्ग पोलिस हवालदार जितेंद्र माळी, सचिन अडावदकर, थोरात, विजय निकम व ललित महाजन यांनी तातडीने धाव घेऊन दगडमाती हटवली. यामुळे काहीवेळातच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. प्रवाशांनी कन्नड घाटातून प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---