ओडिसी इलेक्ट्रिक ट्रॉट स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत

तरुण भारत लाईव्ह ।११ फेब्रुवारी २०२३। सद्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड चालू आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा फायदा असा होतो कि प्रदुषण कमी होते तसेच इलेक्ट्रिक गाडीला पेट्रोल लागत नसल्याने पेट्रोलची आणि पैशांची बचत होते. यामुळेच बरीच लोकं इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे पसंत करतात. हे लक्षात घेऊन ओडिसी कंपनीने बी2बी इलेक्ट्रिक स्कूटर ट्रॉटला लाँच केले. या स्कूटरचे फीचर्स आणि या स्कूटरची किंमत जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

इलेक्ट्रिक व्हेईकल निर्माता ओडिसी कंपनीने बी2बी इलेक्ट्रिक स्कूटर ट्रॉटला लाँच केले आहे. या स्कूटर चे फीचर्स असे कि ट्रॉटमध्ये २५० वॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. या वाहनाचा कमाल वेग २५ किमी प्रति तास इतका आहे. चार्जिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने या वाहनात 60V 32Ah क्षमतेची काढता येणारी वॉटरप्रूफ बॅटरी लावलेली आहे. ही बॅटरी २ तासांत ६० टक्के चार्ज होते आणि संपूर्ण चार्ज व्हायला ४ तास लागतात. एका चार्जमध्ये ही गाडी ७५ किमीची रेंज देते. ही स्कूटर सर्वात मजबूत हेवी ड्यूटी बाइक आहे. याला २५० किलोपर्यंतच्या लोडिंग क्षमते सोबत लास्ट माइल लोजिस्टिक्स सोबत डिझाइन करण्यात आले आहे.  या स्कूटरची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे.

गॅस सिलिंडर, किराणा सामान, औषधे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत यावर कामे करता येवू शकतात. या इलेक्ट्रिक स्कूटरतर्फे बॅटरीवर ३ वर्षांची आणि पॉवरट्रेनवर १ वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. भारतभरातील ओडिसी डीलर्स आणि स्टोअर्सकडून ट्रॉट खरेदी करता येऊ शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर चार कलर ऑप्शन येलो, ब्लॅक, रेड आणि मरून कलरमध्ये उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ट्रॉट स्मार्ट बीएमएस, आयओटी ट्रॅकिंग डिवाइस, एलईडी ओडोमीटर सारख्या खास सुविधा दिल्या आहेत. जर तुम्ही नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि स्कूटर तुमच्यासाठी बेस्ट ऑपशन ठरू शकतो.