तरुण भारत लाईव्ह । मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या माध्यमातून जोरदार धक्का बसला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली. डॉ. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळं ही सनद रद्द करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला चिथावणी दिल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आला होता.
तसेच मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मीडिया समोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा करत बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता.त्यामुळे वकिली करत असताना त्यांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं असल्याने त्यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे.