सफरचंद रबडी तयार करण्याची सोप्पी पद्धत

तरुण भारत लाईव्ह । १८ जानेवारी २०२३। रबडी हा भारतीय उपखंडातून उगम पावलेला एक गोड पदार्थ आहे. तुम्ही आतापर्यंत  सीताफळ रबडी, दूध रबडी खाल्ली असेल.  रबडी मध्ये आणखी एक प्रकार पहायला मिळतो तो म्हणजे सफरचंद रबडी. ही घरी करून पहायला पण खूप सोप्पी आहे, चला तर पाहूया सफरचंद रबडी बनवण्याचे साहित्य आणि कृती.

साहित्य
साखर, सुकामेवा, वेलची, जायफळ, एक सफरचंद, फुल क्रिम मिल्क

कृती
प्रथम सफरचंद सोलून घ्यावे. त्यानंतर सफरचंद किसणी ने किसावे. त्यानंतर एका पॅन मध्ये दूध गरम करा. दूध घट्ट होइपर्यंत दूध गरम करा. दूध घट्ट झाल्यावर किसलेले सफरचंद त्यात मिक्स करा. त्यानंतर साखर घालून मिश्रण एकजीव करून त्यावर वेलची, जायफळ, आणि आवडीनुसार सुकामेवा घालावा (सुकामेव्याचे तुकडे बारीक करून घ्यावे ) त्यांनतर सफरचंद रबडी २ मिनिटे शिजवायला ठेवावी आणि सर्व्ह करावी.