---Advertisement---

वरखेड्याला विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू, आतापर्यंत तीन बिबटे मृत्युमुखी

---Advertisement---

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात वरखेडे शिवार परिसरात विहिरीमध्ये मृत बिबट्या तरंगत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याला बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदनानंतर गुरुवारी दुपारी त्याच्यावर सुरक्षित ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

वरखेडे येथील स्थानिक शेतकरी अनिल पवार हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास वीज गेली म्हणून विहिरीकडे आले असता त्यांना विहिरीत मृत झालेला बिबट्या तरंगताना दिसून आला. वरखेडे गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर विहिरीत बिबट्या मृत झाल्याची घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पाणी भरले जात होते. सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला म्हणून अनिल पवार हे विहिरीकडे आले. दरम्यान, त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता त्यांना पाण्यावर मृत बिबट्या तरंगत असल्याचे दिसले. पवार यांनी इतर शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांकडून माहिती मिळताच चाळीसगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, मृत बिबट्याला बाहेर काढण्यात येऊन पशुचिकित्सक डॉ. ऋषिकेश मंत्री यांच्यासह पशुविभाग अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. गत तीन-चार महिन्यात चाळीसगाव तालुक्यात चितेगाव, गणेशपूर आणि आता वरखेडे अशा ठिकाणी तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment