---Advertisement---
साक्री : तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कावठे गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गुरु वजनकाटा जवळील धुळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला.
वनविभागाला याबाबतची माहिती मिळताच तत्काळ सहायक वनसंरक्षक धुळे योगेश सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी कोडाईबारी ढोले, वनपाल नेरकर, देसले, वनरक्षक गणेश बोरसे, विजयसिंग राठोड, आणि वनमजूर उपस्थित होते.
या घटनेचा तपास असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या घटनेप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी विभागाने पशुवैद्यकीय अधिकारी मिथुन पावरा यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.
त्यानंतर, पेरेजपूर येथील राखीव वनकक्ष क्रमांक ३९६ मध्ये बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.