बिबट्या-वाघोबांचा आता,सिमेंटच्या जंगलात घरोबा!

 

वेध

– नंदकिशोर काथवटे

leopard in cities माणसांनी आपल्या स्वार्थासाठी मिळेल ती जागा आणि वाटेल त्या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले आहे. आपल्या परिसराबाहेर जाऊन अतिक्रमणासाठी माणसाला आता जंगलेही कमी पडू लागली आहेत. त्यामुळेच जंगली श्वापदांचा वावर जंगल सोडून मानवी वस्तीपर्यंत पोहोचू लागला आहे. leopard in cities ज्या जंगलाचा वापर वाघ, बिबट यांनी करायला हवा, त्या जंगलात अवैध पद्धतीने माणसाने शिरकाव केल्याने जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये धडकू लागले आहेत. leopard in cities संपूर्ण राज्यात बिबट्यांची संख्या २८०० असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातील काही बिबट जंगल सोडून सिमेंटच्या जंगलांपर्यंत पोहोचले आहेत. राज्यात बिबट्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. leopard in cities जंगलातील मानवी हस्तक्षेपानंतर बिबट्यांचा वावर सिमेंटच्या जंगलात राजरोसपणे सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.

leopard in cities राज्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये रोज कुणाच्या ना कुणाच्या घरात बिबट्याचा झालेला शिरकाव, त्यांनी केलेला माणसांवरचा हल्ला यामुळे नागरिक त्रस्त आहेत. जंगलाबाहेर बिबट्याचा असलेला वावर आणि त्यांची संख्या लक्षात घेता वन विभागाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. leopard in cities विदर्भातील मेळघाट, ताडोबा अंधारी, पेंच, नवेगाव, नागझिरा आणि गडचिरोलीतील काही भागांमध्ये याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने शिकारीच्या शोधात बिबटे जंगलाबाहेर पडून सिमेंटच्या जंगलात दाखल होऊ लागले आहेत. निश्चितच बिबटे शहरात शिरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. leopard in cities लोकांना या जंगली श्वापदांची भीती वाटत असतानाच बिबट्याच्या शिकारीचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षात संपूर्ण राज्यात ४२ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाघांनी माणसांवर हल्ले केले की त्याची नोंद होते. नुकसान भरपाई दिली जाते. leopard in cities मात्र, माणसाने वाघाची शिकार केल्यानंतर राष्ट्राच्या होणा-या नुकसान भरपाईचे काय?

बिबट्यांकडून माणसांवर होणा-या हल्ल्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. leopard in cities  मात्र, बिबट्यांचे हल्ले दिवसागणीक का वाढत आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे. बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर एखादी व्यक्ती दगावल्यास शासनाकडून त्याच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत केली जाते. leopard in cities मात्र, बिबट्या गावात का आला, याला कोण जबाबदार, यावर काहीच बोलायला वन विभागाचे अधिकारी तयार नसतात. त्यामुळेच बिबट्याच्या हल्ल्यावरून नागरिकांमध्येही प्रचंड संताप व्यक्त होतो. वन्यजीव कायद्यांतर्गत वन्यप्राण्यांची शिकार केल्यास दोषी व्यक्तींवर कडक कारवाई केली जाऊनही वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना सातत्याने घडतात. leopard in cities त्यामुळे केवळ नागरिकांवर कारवाई करून शिकारीचा प्रश्न सुटणार नसल्याने वन्यप्राण्यांसंदर्भात जंगलाला लागून असलेल्या गावातील लोकांना वन्यजीवाच्या अस्तित्वाचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी एकीकडे शासन स्तरावरून कायदे केले जात असतानाच दुसरीकडे त्यांचे अस्तित्व जपण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. leopard in cities बिबट्यांना जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने त्यांनी जंगलाला लागून असलेल्या शहराकडे धाव घेतली आहे.

राज्यात बिबट्यांची संख्या दिवसागणीक वाढत असून हे बिबटे आता जंगल सोडून शहराकडे येऊ लागले आहेत. leopard in cities घराच्या दिवाणखान्यापासून तर स्वयंपाकघरापर्यंत बिबट शिरल्याच्या घटना कितीतरी वेळा घडल्या आहेत. जंगलाबाहेर मानवी वस्त्यांमध्ये वाढलेला बिबट्यांचा वावर धोकादायक ठरू लागला असून अशी परिस्थिती निर्माण होणे हे मानव आणि वन्यप्राण्यांसाठीसुद्धा तितकेच घातक आहे. leopard in cities वन्यजीवांच्या संवर्धनासाठी नियम बनविताना जंगल परिसराला लागून असणा-या लोकांच्या अडचणी समजून घेण्याची, त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तेव्हाच बिबट्यांच्या अवैध शिकारीस आळा बसेल. ऊसाचे मळे, झुडपी जंगल या ठिकाणी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. बिबट्यांना लागणारे खाद्य, पाणी आणि इतर पोषक वातावरण यामुळे बिबट्यांचा वावर मानवी भागात वाढला आहे, ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. leopard in cities संपूर्ण राज्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची चर्चा रोजच असते. मात्र, यावर तोडगा काढण्यात वन विभागाला अपयश आले आहे, असे खेदाने नमूद करावे लागते.

 ९९२२९९९५८८