---Advertisement---
तळोदा : तालुक्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात २ वर्षीय मादी बिबट्या अडकला आहे. वर्षभरा आता पर्यन्त तालुक्यात १६ बिबट्या यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले तरी अजून अनेक बिबटे वेगवेगळ्या भागात मुक्त संचार करीत असल्याच्या तकारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
तळोदा तालुक्यात वारंवार बिबट्या वेगळ वेगळ्या भागातील जनतेला दर्शन देत होता. या घटनेत तालुक्यातील जनतेमध्ये प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले होते. त्यासंदर्भात प्रतापुर येथील नागरीकांकडून वन विभागाला तोंडी सूचना, अर्ज देण्यात आले होते. या परिसरात वारंवार दृष्टीस पडणाऱ्या बिबट वन्य प्राण्याबाबत जनतेच्या तक्रारी होत्या.
यातून पशुधन हानीच्या सुद्धा काही घटना घडल्या होत्या. भविष्यात मानवा वरही बिबट्या हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून प्रसंगावधान राखून प्रतापपुर येथील सरपंच कमलाबाई पावरा यांच्या शेतात तळोदा वन विभागाने पिंजरा लावायची कारवाई करण्यात आली होती. दि 23 सप्टेबर रोजी पिंजऱ्यात साधारण वय २ वर्ष याची मादी बिबट्या अडकला असून पुढील कार्यवाही सुरू आहे यावेळी वनक्षेत्रपाल श्री. एस. बी. सोनवणे वनपाल बी.बी. सयाईस वनरक्षक संदिप भंडारी, राहुल कोकणी, विरसिंग पावरा, महेंद्र तडवी, जान्या पाडवी, जेकमसिंग वसावे, नामदेव डोंगरे, अमरसिंग वसावे, अशितोष पावरा आदि उपस्थित होते
---Advertisement---