तरुण भारत लाईव्ह । प्रीतम गेडाम । Library ग्रंथालये वाचकांसाठी ज्ञानाचा महासागर आहेत. आज ग्रंथालयांशिवाय शिक्षण व सुसंस्कृत समाजाची कल्पनाच करता येत नाही. आपल्या सर्वांच्या जीवनात ग्रंथालयांचे अमूल्य योगदान आहे. Library आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीत पुस्तके माणसाशी खèया मित्रासारखी सोबतीला असतात. हे तेव्हाही सोबत असतात, जेव्हा आपल्याला कोणी साथ देत नाही. ज्याला जीवनात ग्रंथालयाचे मूल्य समजले नाही, तो उत्कृष्ट जीवन जगला, असे म्हणता येणार नाही. Library ग्रंथालये वाचकांना, त्यांचे जीवन सोपे, सुलभ, उज्ज्वल आणि प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी सतत प्रेरित करून एक चांगला मार्ग तयार करतात. ग्रंथालयांचे जाळे जगभर पसरलेले आहे. ग्रंथालयांच्या विकासासाठी सर्वाधिक आवश्यक घटक म्हणजे तज्ज्ञ कर्मचारी, योग्य वाचन साहित्य आणि पुरेशा निधीसह उत्कृष्ट व्यवस्थापन. Library विकसित ग्रंथालये वाचकांना उत्तम सेवा देऊन देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतात. ग्रंथालये ही शिक्षण केंद्रात ज्ञानाचे मुख्य स्रोत म्हणून ओळखली जातात. Libraryआज अत्याधुनिक लायब्ररी आपल्या मोबाईलमध्येसुद्धा समाविष्ट झाल्या आहेत. Library एका क्लिकवर आपल्याला जगभरातील ग्रंथालयांमध्ये सहज प्रवेश मिळतो.
सुसज्ज ग्रंथालये हाच राष्ट्राचा आधार!
देशातील ग्रंथालयांच्या स्थितीचे वास्तव Library
परदेशाप्रमाणे आपल्या देशातील ग्रंथालयांचे चित्र बरेच बदलले आहे. देशातील आयआयटी, आयआयएम, एम्स यासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांची ग्रंथालये जागतिक दर्जाची आहेत. अनेक खाजगी शैक्षणिक संस्थाही ग्रंथालयांच्या विकासाकडे विशेष लक्ष देतात. Library पण सर्वत्र असे नाही. आजच्या युगात पैशाला अधिक महत्त्व दिले जाते आणि ग्रंथालये ही पैसे कमाविण्याची केंद्रे नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांचे महत्त्व कमी मापले जात आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात ग्रंथालये अस्तित्वाची लढाई लढत आहेत. आर्थिक चणचण आणि कुशल कर्मचा-यांची कमतरता यामुळे अनेक ग्रंथालये नाममात्र राहिली आहेत. Library अनेक ग्रंथालयांमध्ये सेवेच्या नावाखाली फक्त मोजकी वर्तमानपत्रे उपलब्ध असतात, तर अनेक ग्रंथालयांमध्ये चांगल्या देखभालीअभावी मौल्यवान वाचन साहित्य खराब होत आहे. Library अनेक ग्रंथालयांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, तर अनेक ग्रंथालये कुशल कर्मचाèयांअभावी वाईट अवस्थेत आहेत.
अनेक ग्रंथालयांमध्ये खुच्र्या, टेबल, कपाट, खिडक्या, दरवाजे तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. Library अनेक ग्रंथालयांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत, तर अनेक ग्रंथालयांमध्ये पावसाळ्यात छतातून पाणी टपकते. अशा समस्यांमुळे जगाला दिशा दाखविणारी ग्रंथालये आज दिशाहीन होत आहेत. Library अनेक मोठी ग्रंथालये केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या भरवशावर चालत आहेत. अनेक राज्यांच्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये, शाळा-महाविद्यालयांमध्ये, महानगरपालिका किंवा इतर सरकारी क्षेत्रातील ग्रंथालयांमध्ये तज्ज्ञ, कुशल कर्मचा-यांची भरती होऊन काही वर्षे नाही, तर अनेक दशके उलटून गेली आहेत. जबाबदार विभाग किंवा प्रशासनाला ग्रंथालयांचे महत्त्व कळत नाही, असे नाही. ग्रंथालयांचे महत्त्व समजून निधीची उपलब्धता आणि तज्ज्ञ कर्मचा-यांची भरती लवकरच केली जाईल, असे आश्वासन त्यांच्याकडून सातत्याने मिळत असते. Library दिवस, महिने, वर्षे उलटतात, ग्रंथालयांची अवस्था आणखी बिकट होत जाते. कर्मचारी निवृत्त झाले तरी नवीन कर्मचा-यांची भरती होत नाही. Library देशातील अनेक ग्रंथालयांची इतकी वाईट अवस्था असताना, वाचकांची ज्ञानाची तहान कशी भागणार, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे.
जीवनात ग्रंथालयांची भूमिका अनमोल Library
जगात असेच देश विकसित झाले आहेत, ज्यांनी शिक्षणक्रांतीचे महत्त्व ओळखून शिक्षणासोबतच त्याला वाव देण्याकरिता ग्रंथालयांची उन्नती केली. कारण, ग्रंथालये शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत. Library ती वेळेची बचत करून मनुष्याला योग्य दिशा देऊन ज्ञानी बनवतात. जगातील महान व्यक्तिमत्त्वांचे सोबती म्हणून पुस्तके ओळखली जातात. जे पुस्तकांशी मैत्री करतात, ते आयुष्यात कधीच एकटे नसतात. शालेय शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत ग्रंथालये मानवाला मार्गदर्शन करतात. जिथे शिक्षकालाही ज्ञानाची तळमळ असते, ते केंद्र म्हणजे ग्रंथालय. Library जीवनाचा अविभाज्य घटक असलेली ग्रंथालये आज उपेक्षेची केंद्रे बनली आहेत. देशातील अनेक राज्यांतील सार्वजनिक व शैक्षणिक ग्रंथालयांमध्ये मूलभूत सुविधाही नाहीत. त्यामुळे विद्याथ्र्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. Library ज्या वयात मुले आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करीत असतात, त्याच वयात ग्रंथालयांच्या ज्ञानाच्या रूपाने महत्त्वाच्या मार्गदर्शनापासून ते वंचित राहत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा पाया बळकट कसा होणार?
ग्रंथालयांकडे दुर्लक्ष म्हणजे सुशिक्षित समाजाचा विकास थांबवणे
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदार विभागाने ग्रंथालयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. ग्रंथालयांमध्ये कुशल कर्मचा-यांच्या भरतीकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे. ग्रंथालयांतील सेवा-सुविधा आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यावर जबाबदार अधिकारी, विभाग, व्यवस्थापन आणि प्रशासनाने भर देणे गरजेचे आहे. योग्य अर्थसंकल्पाअभावी अनेक ग्रंथालये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. Library त्यामुळे ग्रंथालयांचे योग्य व्यवस्थापन आणि विकास करण्यासाठी निधीची सतत उपलब्धता असायला हवी. ग्रामीण भागात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सर्व प्रकारचे स्थानिक प्रशासन महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणा-या सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, अनुदानित सार्वजनिक आणि इतर ग्रंथालयांनी दरवर्षी आवश्यकतेनुसार ग्रंथालयीन कर्मचारी भरती करावी, ग्रंथालयांच्या पातळीनुसार व योग्यतेनुसार दरवर्षी ग्रंथालय वाचन साहित्य खरेदी केले जावे व प्रत्येक जिल्ह्यात जागतिक दर्जाची अत्याधुनिक ग्रंथालये निर्माण करणे ही काळाची गरज आहे. Library देशाचे शैक्षणिक धोरण बळकट करण्यासाठी ग्रंथालये विकसित करायलाच हवीत. सुशिक्षित समाजात ग्रंथालयांना योग्य स्थान देण्यासाठी सरकारने शिक्षणाबरोबरच ग्रंथालयांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याचा विचार करायला हवा. Library प्रत्येक गाव, शहर, वर्ग, प्रत्येक विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी, व्यापारी, नोकरदार आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ग्रंथालयांचा लाभ पोहोचल्यास देशातील विकास ख-या अर्थाने दिसू लागेल.