तरुण भारत लाईव्ह न्युज : आपणास विश्वास बसणार नाही अशी माहीती समोर येत आहे. एलआयसीकडे जवळपास २१,५०० कोटी रुपये आहेत, ज्यांच्यावर अद्याप कोणीही दावा केलेला नाही
एलआयसीच्या सध्याच्या दावा न केलेल्या रकमेबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. परंतु जेव्हा कंपनीने आपला आयपीओ लाँच केला तेव्हा त्यांनी कागदपत्रांमध्ये यासंदर्भातील माहिती दिली होती. सप्टेंबर २०२१ पर्यंत २१,५३९ कोटी रुपये अनक्लेम्ड असल्याचं सांगण्यात आलं होतं. जर यापैकी तुमची तर पॉलिसी अनक्लेम्ड नाही ना हे जाणून घ्यायचं असेल तर याचीसंपूर्ण प्रक्रिया नक्की जाणून घ्या. एलआयसीने आपल्या पोर्टलवर एक विशेष टूल दिले आहे. येथे तुम्ही तुमच्या पॉलिसीचे तपशील सांगून दावा न केलेली रक्कम शोधू शकता.
– सर्वप्रथम एलआयसीच्या साईटवर जा.
– त्यानंतर तुम्हाला कस्टमर सर्व्हिस सेक्शनमध्ये जावं लागेल.
– याठिकाणी तुम्हाला ‘Unclaimed Amount of Policyholders’ वर क्लिक करावं लागेल.
– त्यानंतर एक विंडो ओपन होईल, त्या ठिकामी तुम्हाला पॉलिसीशी निगडीत माहिती टाकावी लागेल.
– त्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनक्लेम्ड अमाऊंटची डिटेल येईल.
– केवायसीनंतर करू शकता क्लेम
तुम्ही एलआयसीमध्ये दावा न केलेल्या रकमेवर दावा करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे योग्य KYC करून घ्यावे लागेल, तसेच पॉलिसीधारकाचे KYC देखील अपडेट करावे लागेल. याशिवाय तुम्हाला पॉलिसीशी संबंधित कागदपत्रेही सादर करावी लागतील. एलआयसीकडून जारी केलेली ही रक्कम पॉलिसीधारकाच्या खात्यात जमा केली जाईल.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सुमारे ३५,००० कोटी रुपयांचे वारस शोधण्यासाठी एक नवीन सेंट्रलाईज्ड पोर्टल तयार करण्याची घोषणा केली आहे. कदाचित दोन ते चार महिन्यांत हे पोर्टलही लाइव्ह होईल.