---Advertisement---

मोठी बातमी ! १०वी पास लाडक्या बहीणींसाठी आज लॉन्च होणार खास योजना

---Advertisement---

१०वी पास लाडक्या महिणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी  खास भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाच्या पानिपत येथे या योजनेचा शुभारंभ करणार आहे.

LIC ची विमा सखी योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सशक्तीकरण देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे त्या महिलांना विमा क्षेत्रात करिअरची संधी मिळू शकेल.

योजनेची वैशिष्ट्ये 

उमेदवारांची पात्रता
वय : 18 ते 70 वर्षे
शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण, ग्रामीण किंवा निमशहरी भागातील महिलांना प्राधान्य

भूमिका
विमा सखी महिला एलआयसीची प्रतिनिधी म्हणून काम करतील.
ग्राहकांना विमा उत्पादनांबद्दल माहिती देणे, विमा पॉलिसी विक्री करणे, आणि सेवांसाठी मदत करणे.

उद्दिष्ट
महिलांना स्वावलंबी बनवणे.
त्यांच्या अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून देणे.
ग्रामीण भागातील विमा साक्षरता वाढवणे.

फायदे
विमा सखीला प्रशिक्षण दिले जाईल.
कामासाठी सन्मानजनक कमाईची संधी.
समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढेल.

आज, 9 डिसेंबर 2024 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाच्या पानिपत येथे या योजनेचा शुभारंभ करतील आणि महिलांना नियुक्तीपत्रे प्रदान करतील. ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराची उत्तम संधी ठरेल आणि महिलांचे आर्थिक सशक्तीकरण साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---