जळगाव : श्री हनुमंताच्या दिव्य अलौकिक शक्तीचा परिचय नव्या पिढीला व्हावा. त्यांच्या जीवन चरित्रातून बोध घेऊन तरुण वर्गाला प्रेरित करणे, बल व बुद्धिमत्तेचे जीवनातील महत्त्व समजावून घेत श्री हनुमंताला महावीर म्हणून का संबोधले जाते या तीन दिवसीय हनुमंत चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंता भय यापासून मुक्ती देऊन कष्टमय जीवनाला सुखी करणारे श्री हनुमान चरित्र सदैव प्रेरणादायी असल्याचे उद्बोधन पंडित पुष्पा नंदन जी यांनी प्रथम पुष्प गुंफतांना केले.
कलश यात्रेद्वारे स्वागत
दुपारी पांजरापोळ संस्थान येथे महिलांच्या कलश यात्रेने कथाकार पंडित पुष्प नंदन जी महाराजांचे स्वागत करण्यात आले. यात धर्म सेवा महिला मंडळ, जळगाव शहर तालुका माहेश्वरी महिला मंडळ, सिखवाल ब्राह्मण समाज महिला मंडळ, संस्कार परिवार, माहेश्वरी गो सेवा संघ,सहभागी झाले होते. प्रभू रामचंद्र व श्री पवनपुत्र हनुमानाचा जयघोष करीत निरुपणकार पं. पुश्पनंदन जी महाराज यांचेवर पुष्प वर्षावात स्वागत यात्रेतून कथा स्थळावर वाजत गाजत नेण्यात आले. आजच्या कथेतील पहिल्या दिवसाच्या महाआरतीचा मान पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष विजय काबरा यांना देण्यात आला.
ग्रंथ व श्री हनुमंत पूजन, सत्कार
कथास्थळी पं. पुष्प नंदन जी यांना स्थानापन्न करण्या अगोदर श्री रामायण व श्री हनुमंत चालीसा ग्रंथाचे पूजन श्री ओमप्रकाश जाजू परिवारातर्फे करण्यात आले .तसेच अध्यक्ष विश्वनाथ जोशी,सुरेश कोठारी,दिलीप व्यास, दीपक लढ्ढा, गोपाळ पंडित, चंदू पंडित, मुरली चांडक यांच्या हस्ते पं.पुष्प नंदन जी यांचा सत्कार करण्यात आला.
खान्देश भूमीत प्रथमच हनुमंत कथेचे आयोजन…
श्री हनुमंत चरित्र कथा कार्यक्रम जळगावात प्रथमच हनुमंत जन्म उत्सवाचे निमितांने आयोजित होत आहे. पं. पुष्पानंदन जी यांच्या रसाळ वाणीतून जन्मोत्सव, विवाह उत्सव ,राज्याभिषेक उत्सव,या संदर्भात सखोल माहितीचा लाभ भाविकांना होणार आहे. श्री हनुमंता ला श्रीरामांनी अयोध्येचा राजा का बनवले ? श्री हनुमंताचे लग्न कसे झाले? का झाले? श्री हनुमंताचे पूत्र कोण? या सर्व प्रश्नांचे,रहस्यमय विषयाचा उलगडा या हनुमंत चरित्र कथेतून भाविकांना होणार आहे.
सजीव आरासने वेधले लक्ष
प्रथम पुष्प सादर करीत असताना श्री हनुमंताच्या रंजक कथेतील विविध लीला व अवतार कार्याची माहिती भाविक भक्तांना पं. पुष्पा नंदन जी महाराज यांनी दिली .यादरम्यान कथा सुरू असतांनाच सायंकाळी सजीव आकर्षक आरासीतून बाल रूपातील श्री हनुमंताच्या जन्म उत्सव कार्यक्रमाने वातावरणात रंगत भरली . यात .नमित अमित धूत याने ही बाल हनुमंताची भूमिका साकारली. ही सजीव आरास उभारणी कामी जळगाव शहर तालुका माहेश्वरी महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले