शेजारील देशांप्रमाणे आपल्या देशात देखील सत्ता पलट : आ. एकनाथराव खडसे

---Advertisement---

 

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (११ सप्टेंबर ) रोजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत आ. एकनाथराव खडसे यांनी नेपाळच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडेल.

आ. एकनाथ खडसे पुढे म्हणले की, देशात तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे तरुणांमध्ये उद्रेक निर्माण होऊन नेपाळची सत्ता पलटली आहे. यापूर्वी श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशातही सत्ता पलट झाली, आता तुमचा नंबर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना हाताला काम देण्याचे आश्वासन दिले. परंतु तरुणांना आतापर्यंत कुठलेही काम मिळाले नाही. त्यामुळे तरुणांच्या मनात आक्रोश आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

ओबीसी आणी मराठा आरक्षण

सत्तेत येण्यापूर्वी सरकारने नागरिकांना दिलेल्या आश्वासन पूर्ण केलेले नाही त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. ओबीसी समाज मराठा समाज एसटी, लिंगायत समाज कोळी बांधव यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. समाजा समाजामध्ये भानगडी लावण्याचे काम हे सरकार करत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची इच्छा सरकारची नाही हे सरकार मराठा आणि ओबीसी समाजाच्या विरोधात आहे.

चार मंत्री असताना जिल्ह्यात केळीला भाव नाही

नुसत्या घोषणा करायच्या परंतु प्रत्यक्षात कुठलेही काम करायचे नाही. जळगाव जिल्ह्यात चार मंत्री असताना देखील केळी उत्पादकांना योग्य तो भाव मिळत नाही. गेल्या काही वर्षांपासून केळी महामंडळाची स्थापना करावी अशी मी मागणी करत आहे. परंतु सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहे. आज केळीला के 2 हजार पेक्षा कमी भाव मिळत आहे.

जिल्ह्यात संघटनात्मक काम करण्याची गरज + खडसे
जळगाव जिल्ह्यात 398 पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संघटनात्मक काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी समन्वय साधून काम करावे असे देखील त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---