मासे खाण्याऱ्यांनो.. सावधान! ‘हा’ मासा खाल्ल्याने एक तासानंतर महिलेचा मृत्यू, पती कोमात

नवी दिल्ली : मलेशियामध्ये पफर मासा खाल्याने लिम सिउ गुआन नावाच्या ८३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. लिमाने गेल्या महिन्यात पफर हा मासा खाल्ला होता. त्यानंतर तिच्यावर आणि तिच्या पतीवर उपचार सुरू होता. लिमाचा पती ८४ वर्षाचा आहे. तो सध्या कोमात आयसीयूमध्ये आहे. दुपारच्या जेवणात पफर मासा खाल्याने दोघाही पती-पत्नीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर ते दोघे ही तातडीने रूग्णालयात दाखल झाले होते.
पफर या माशात घातक विषारी घटक असतात. म्हणूनच महिला आणि तिचा पती आजारी पडले आणि लिमाला त्यात जीव गमवावा लागला. या घटनेबद्दल लिमाच्या मुलीने सांगितले की, तिच्या वडिलांनी स्थानिक दुकानातून पफर फिश विकत घेतले होते. वर्षानुवर्षे त्याच दुकानातून तो मासे खरेदी करत असे.२५ मार्चला ही त्यांनी असेच केले. त्यानंतर त्यांनी तो मासा खाल्यावर तिच्या वडिलांच्या लक्षात आले की, मासे खाल्ल्यानंतर काही वेळातच लिमाला उलट्या होत असून श्वास घेण्यास त्रास होत आहे.

आता जेव्हा लिमाचा मृत्यू झाला आहे.तेव्हा लिमाच्या पतीबद्दल त्यांच्या मुलीला डॉक्टरांनी सांगितले आहे की, जर तुमचे वडिल ठिक झाले तरी त्यांची प्रकृती पुर्वीसारखी राहणार नाही.या घटनेवर अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे की जपानी डिश पफर फिशमध्ये घातक विष आढळते. या माशात टेट्रोडोटॉक्सिन आणि सॅक्सिटॉक्सिन आढळतात. हे विषारी विष शिजवून आणि गोठवूनही नष्ट होऊ शकत नाही. ही डिश जपानमध्ये खूप आवडती मानली जाते आणि केवळ कुशल शेफच ते बनवू शकतात.