क्रिएटीव्ह गृप आयोजित अभियंतादिनी ऐका कहाणी रायगडाच्या जीर्णाध्दाराची

जळगाव :  येथील क्रिएटीव्ह गृपतर्फे अभियंता दिनाच्या निमित्तानेे अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि जीर्णोद्धार’ या विषयावर रायगड विकास प्राधिकरणाचे आर्कीटेक्ट वरूण भामरे मार्गदर्शन करणार आहेत.  महाबळ रोडवरील मायादेवी नगरातील रोटरी भवनात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल.

महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला होता. या रायगडाच्या संवर्धनाचे आणि जीर्णाध्दाराचे काम आर्किटेक वरूण भामरे हे करत आहेत. यासोबत विविध गडकिल्ल्यांच्या संर्वधनाचेही ते काम करत आहेत. त्यांच्या या व्याख्यानातून रायगडासह विविध गडकिल्याच्या  स्थापत्यकलेविषयीचे रहस्य उलगडणार आहे.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार असतील.