दृष्टिक्षेप
– उदय निरगुडकर
Lythium rush आपल्याकडे अनेक शतकांपासून सोन्याचा शोध सुरू आहे. मागच्या दोन दशकांमध्ये या शोधाचा रंजक, थरारक आणि हिंसात्मक इतिहास वारंवार प्रसिद्ध झाला आहे.
या वेडापायी अनेकांचे नशीब फळफळले तर अनेक जण बुडाले. या रंजक कहाण्यांवर अनेक पुस्तके लिहिली गेली, कादंब-या लिहिल्या गेल्या. lythium rush टीव्हीवरच्या मालिकादेखील आल्या. तर, यावरची सर्वोत्तम कलाकृती म्हणजे १९२५ साली प्रसिद्ध झालेला चार्ली चॅप्लिनचा चित्रपट ‘गोल्ड रश’ चॅप्लिनची ही सर्वात महान कलाकृती. १ तास ३५ मिनिटांच्या या मूकपटाने अक्षरश: इतिहास घडवला आणि चॅप्लिनचं ‘लिटल ट्रॅम्प पर्सोना’ हे गारुड कायमच वसवलं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे अलीकडेच जिऑॅलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाच्या अधिका-यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भारतामध्ये लिथियमचे ५.९ मिलियन टन इतके प्रचंड साठे सापडल्याचा शोध जाहीर केला. lythium rush आता लिथियम म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व हे फार तर रसायनशास्त्र अथवा धातुशास्त्र शिकणा-यांना माहीत असेल. परंतु या एका शोधामध्ये भारतीय उपखंडाचं चित्र पालटून टाकण्याची क्षमता आहे. lythium rush म्हणून या ‘गेमचेंजर’ घटनेची सखोल चर्चा आवश्यक ठरते.
lythium rush सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल्सचा खप जोमाने वाढतोय् आणि ऑटोमोबाईल व्यवसायाचं भवितव्य ‘इव्ही’मध्येच आहे. आता या इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो म्हणजे वाहनाला ऊर्जा देणारी बॅटरी आणि त्या बॅटरीतील सर्वात महत्त्वाचा लिथियम हा घटक आणि त्याचे प्रचंड मोठे स्रोत जम्मू-काश्मीरमध्ये सापडल्याचा दावा भारत सरकारतर्फे करण्यात आला आहे. lythium rush आज भारतातल्या एकूण ऑटोमोबाईल विक्रीपैकी दोन टक्के विक्री ही ‘इव्ही’ची आहे. पुढील पाच-सात वर्षांत जवळपास दीड कोटी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झालेली असू शकते. सध्या ‘इव्ही’ विक्रीत प्रामुख्याने दुचाकी विकल्या जात आहेत; उद्या चारचाकीदेखील जोमाने विकल्या जातील, यात शंकाच नाही. यात प्रमुख अडचण आहे, इलेक्ट्रिक व्हेईकलच्या किमतींची. या किमतींचा महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील बॅटरी. lythium rush येत्या काळात बॅटरीच्या किमती ३० टक्क्यांनी कमी झाल्या तर विक्रीच्या संख्येत कित्येक पटींनी वाढ होईल. अपु-या चार्जिंग स्टेशनचा मुद्दा तीन-चार वर्षांमध्ये सुटेल, अशी पावले पडताना दिसत आहेत. भारताने हवामान बदलावरील जागतिक परिषदेत २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त आणि त्या दिशेने २०३० पर्यंत ५० टक्के उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. lythium rush त्यामुळे या क्षेत्रात भारत आखत असलेले धोरण, स्वीकारत असलेले तंत्रज्ञान ही जगातल्या अनेक राष्ट्रांसाठी विकासाची ब्ल्यू प्रिंट असणार आहे.
lythium rush याचे कारण विकसित राष्ट्रांनी विकासासाठी कार्बन उत्सर्जन करणा-या तंत्रज्ञानाचा मुक्त वापर केला असला, तरी आपल्याला तसा तो करण्याची मुभा नाही. सध्या तरी भारताची बहुतांश ऊर्जेची गरज ही पारंपरिक ऊर्जास्रोतातून पूर्ण होत आहे. या पृष्ठभूमीवर या लिथियमच्या शोधाकडे पाहिले की, त्याचे महत्त्व लक्षात येते. लिथियम बॅट-या या पुन्हा चार्ज करता येतात. त्यांची वाहतूक सुलभपणे करता येते. दिवसागणिक त्याच्या सुरक्षेचे आणि किमतींचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संशोधक प्रयत्न करीत आहेत. lythium rush २०३० पर्यंत भारतातील लिथियम बॅटरीचे मार्केट तब्बल ८० बिलियम डॉलर एवढे असणार आहे. कारण या बॅट-या केवळ वाहनात नव्हे, तर लहान मुलांची खेळणी, संरक्षण सामग्री, इतकेच काय तर मोबाईल आणि लॅपटॉपमध्येदेखील केलेला आढळतो. औषधनिर्मिती क्षेत्रातही याचे काही उपयोग आहेत. म्हणजेच मागच्या शतकात स्टॅटेजिक कमॉडिटी म्हणून जे महत्त्व तेलाला होते ते या शतकात लिथियमला असणार हे उघड आहे. lythium rush त्यामुळे लिथियम हे या शतकाचे सोने आहे आणि ‘गोल्ड रशङ्क सारखी आता ‘लिथियम रश’ या कहाणीला सुरुवात झाली आहे. या लिथियमची किंमत एका ग्रॅमला तब्बल सात हजार रुपये इतके आहे. लिथियमच्या बॅटèया त्याच्या साठवणूक क्षमतेनुसार २५०० रुपयांपासून दीड लाखापर्यंत आहेत.
या चढ्या किमतींचे रहस्य त्याच्या मर्यादित साठे आणि उत्पादन क्षमतेत आहे. या पृष्ठभूमीवर भारतात ५.९ मिलियम टन म्हणजे सध्या उपलब्ध असलेल्या जागतिक साठ्यांपैकी ६ टक्के साठा भारतात आढळून येणे ही एक महत्त्वाची बाब ठरते. lythium rush सध्या चिली, अर्जेटिना, बोलेव्हिया येथे लिथियमचे साठे आढळून येतात. ऑस्ट्रेलियातदेखील ते काही प्रमाणात आहेत. यापूर्वी कर्नाटकमध्ये असे साठे सापडल्याचा दावा करण्यात आला होता. पण त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. असो. सध्या तरी पुढील शोध लागेपर्यंत म्हणजेच सोडियम आयर्न बॅटरी एक पर्याय म्हणून विकसित होईपर्यंत लिथियम बॅट-यांना पर्याय नाही. जगभरातील अर्थतज्ज्ञांमध्ये तेलावरचे अवलंबित्व कमी करण्याविषयी खूप मोठी जागृती झालेली दिसते. lythium rush याचे कारण त्याचे मर्यादित साठे आणि चढ्या किमती. चीन आणि अमेरिका लिथियम बॅटरीच्या जगात अग्रस्थानी असून त्याचे जागतिक मार्केट तब्बल ७० बिलियन डॉलर इतके मोठे आहे. lythium rush चीनमध्ये ४.५ मिलियन टन इतके साठे आहेत. आता कल्पना करा, भारतात आत्ताचे अंदाजित साठे ५.९ मिलियम टनाचे आहेत. म्हणजे हे ‘गेम चेंजर’ असू शकते. याचे आणखी एक कारण म्हणजे आज वाहने तर भारतात बनत आहेत; पण त्यातल्या बॅटरीसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. मग आत्मनिर्भर कसे बनणार?
lythium rush शाळा-महाविद्यालयात ‘पीरिऑडिक टेबल’ शिकलेल्यांना कल्पना असणार की लिथियम हा वजनाला अत्यंत हलका धातू आहे आणि त्याची ऊर्जानिर्मिती क्षमता ९९ टक्के आहे. याचाच अर्थ लिथियम बॅटरी उपलब्ध पर्यायांपेक्षा जवळपास पाचपट अधिक ऊर्जा देऊ शकतात. त्यामुळे पुढील ब-याच काळासाठी जगातील अनेक क्षेत्रांचे अवलंबित्व आणि विकास हा लिथियम बॅटरीवरच असेल. lythium rush गंमत म्हणजे याचे सर्वाधिक साठे अर्जेंटिना, चिली, बोलेव्हिया या दक्षिण अमेरिकेतील गरीब विकसनशील देशात; पण लिथियम मार्केटवर दादागिरी चीनची. या तीन देशांनी एकत्र येऊन एक मोट बांधली असती तर चीनच्या सामर्थ्याला ते धक्का देऊ शकले असते. पण आजमितीला या तिन्ही देशातील खाणींवर, त्याच्या प्रक्रिया उद्योगावर आणि बॅटरी उत्पादनावर चीनच्या गुंतवणुकीची घट्ट पकड आहे. lythium rush याचाच अर्थ भूराजकीयदृष्ट्या देशात लिथियम असणे, ते बॅटरीयोग्य तयार करणे आणि ते जगभरात मार्केट करणे या भिन्न बाबी आहेत आणि आज तरी त्यावर चीनची घट्ट पकड आहे. लिथियम बॅटरी उत्पादन क्षेत्रातील १०७ पैकी १०२ फॅक्टरी चीनमध्ये आहेत, यावरूनच हे सिद्ध होते. या पृष्ठभूमीवर आजच स्रोताचा शोध लागला म्हणजे उद्या लिथियम क्षेत्रात स्वामित्व मिळाले असे होत नाही. lythium rush प्रत्यक्ष उत्पादनाला ५ ते १० वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. या बाबतीत सरकार काय पावले उचलते, त्यांची धोरणे काय आणि लिथियम रेसमध्ये भारतीय उद्योगाचे नेमके स्थान काय असेल याविषयीची सरकारी धोरणे अत्यंत महत्त्वाची आहेत.
या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात लिथियमच्या उत्पादनासाठी लागणा-या सामग्रीवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली तसेच लिथियम आयात करणे कस्टम ड्युटी वाढवून अधिक महाग केले गेले. lythium rush दुसरीकडे या उद्योगातील गुंतवणुकीसाठी चालना म्हणून सरकारने १० हजार कोटी उपलब्ध करून दिले. यावरून सरकारची दिशा आणि धोरण स्पष्ट होते. मग आजच लिथियमचे साठे असू शकतात असे स्रोत समोर आल्यावर होणारा गाजावाजा आणि सेलिब्रेशन्स काहीसे वरातीआधी घोडे नाचवण्याचा प्रकार झाला. लक्षात घ्या, हे स्रोत आहेत, साठे नाहीत. त्याचे उत्पादन सोपे नाही. lythium rush त्याची खाण निर्माण करणे पर्यावरणदृष्ट्या बदललेल्या परिस्थितीत खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळेच या अंदाजित साठ्याची नेमकी किंमत आज तरी काढता येणार नाही. त्यातून काश्मीरमधील या स्रोतांचा प्रदेश पर्यावरणदृष्ट्या संरक्षित म्हणून राखीव आहे. पुढची तीन ते चार वर्षे तर संशोधनामध्येच जातील. या स्रोतांचा शोध १९९९ पासून सुरू होता. खरे तर दशकभरात आपण निष्कर्षाप्रत यायला हवे होते. lythium rush पण या कामी लागलेल्या तीन दशकांचा वेळ आमच्या सरकारी अनास्थेविषयी खूप काही भाष्य करतो. परंतु समोर आलेला संशोधन निष्कर्ष आणि त्याचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. lythium rush यापुढील प्रगती ही विनाअडसर आणि गतिमान होणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताला एक उत्तम, सशक्त, सर्वांगीण विचार करणारी मिनरल स्टॅटेजी असणे आवश्यक आहे. केंद्र सरकार या संदर्भात पावले टाकत असणारच! lythium rush ‘लिथियम रश’ची ही केवळ सुरुवात आहे…