निवडणुकांच्या तारखा आज होणार जाहीर? काही तासांत पत्रकार परिषद, सर्वांचे लागले लक्ष

---Advertisement---

 

मुंबई : राज्य निवडणूक आयोग आज मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असून, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका आधी होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांत होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात या निवडणुका तीन टप्प्यात होतील, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर परिषदांचा समावेश असेल.

२१ दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोग दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तात्काळ घोषणा करू शकतो, तर शेवटच्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, ३१ जानेवारीपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. या निवडणुकांमध्ये राज्यातील २८९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ नगरपालिका समाविष्ट असतील. संपूर्ण राज्य या निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---