---Advertisement---
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांना पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एका महिलेने संदीप पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी हे प्रकरण उपस्थित केले होते. संबंधित महिला एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याची माहिती मिळाली.
तरीही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने निर्णय घेत पाटील यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी गायकवाड यांची नियुक्ती केली.
स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारून शंभर दिवसही पूर्ण करण्याआधीच, फक्त 87 दिवसांतच संदीप पाटील यांना पद सोडावे लागले. यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेवर ड्रग्ज प्रकरण, पेट्रोल-गुटखा आणि हप्ता प्रकरणांमुळे वादंग निर्माण झाले होते. आता निरीक्षकावरील अत्याचाराच्या आरोपांमुळे स्थानिक गुन्हे शाखा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
काय आहे प्रकरण ?
लग्नाचे अमिष दाखवित स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर पीडित महिला तक्रार देण्याकरीत पोलीस ठाण्यात महिलेची चौकशी करुन गेल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. संदीप पाटील यांनी पीडित महिलेला लग्नाचे अमिष दाखवित तिच्यावर जळगाव, धुळे, नाशिक येथे नेवून अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता .