---Advertisement---

बापरे ! लॉजिंगच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार; चाळीसगाव पोलिसांची सिनेस्टाईल छापेमारी

---Advertisement---

जळगाव : चाळीसगाव शहरात लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्याचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
विशेषतः पोलिसांनी सिनेस्टाईल छापेमारी केली. या प्रकरणी व्यवस्थापकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

---Advertisement---

चाळीसगाव शहरात लॉजिंगच्या नावाखाली अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून, सिनेस्टाईल कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वात बनावट ग्राहक पाठवले असता, दोन महिला वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. या प्रकरणी लॉज व्यवस्थापक प्रसाद गवळी, मनोज गवळीसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, दुसऱ्या महिलेला धुळे येथील महिला सुधार कक्षात रवानगी करण्यात आली असून, या सिनेस्टाईल कारवाईत पोलिसांनी लॉजच्या दोन रूममधून ग्राहकांही ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---