Lohara : तालुका पाचोरा , प्रतिनिधी: अयोध्येत होणाऱ्या श्री प्रभू रामलल्ला यांच्या प्रतिप्राणप्रतिष्ठेच्या महाउत्सवानिमित्त लोहारा गावात “न भूतो न भविष्यती “अशी भव्य शोभायात्रा श्रीराम मंदिरा पासून ते संपूर्ण गावात काढण्यात आली.
यावेळी सजवलेल्या बग्गीतून,बँड च्या गजरात व पालखी सह प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची,मूर्तीची श्रीराम मंदिर पासून सुरुवात करून संपूर्ण गावातून मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी शोभायात्रेत महिला,बालक,मुली ,युवा वर्ग ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभू श्रीरामंच्या गाण्याण्याने डीजे च्या तालावर तरुणांने ठेका धरत जल्लोष केला.
लोहारे गावातील सर्वात मोठी व न भूतो न भविष्यती अशी शोभायात्रा ठरली यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती .
प्रभू श्रीराम यांचा जयघोष करत स्वयंस्फू्तीने सहभागी झाले होते,संपूर्ण गावात भक्तिमय व “राममय”वातावरण झाले होते. मिरवणूकीचे १२ वाजता श्रीराम मंदिरात विसर्जन करण्यात आले. यावेळी श्रीराम मंदिरात जमलेल्या भाविकांना अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह बघता यावा यासाठी लोहारा पत्रकार मंच व फोटोग्राफर संघटनेतर्फे मोठ्या एलईडी टिव्हीचा संच बसविण्यात आला होता यावेळी भाविकांनी तो सोहळा लाईव्ह बघितला. त्यानंतर १२.३० वाजता महाआरती ५ जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी महाआरतीला जवळपास ६ते ७ हजार भाविक हजर होते.
यावेळी कार सेवक अशोक चौधरी माधव चौधरी रमेश लिंगायत यांचा सत्कार करण्यात आला.आरती झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांना बुंदी च्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी सर्व उपस्थित भाविकांनी अयोध्येतून आलेल्या अक्षदा श्रीराम मंदिरात अर्पण केल्या.
या महाउत्सव व मिरवणुकीचे नियोजन कैलास चौधरी, शरद सोनार, महेंद्र घोंगडे, गजानन क्षिरसागर, प्रतीक बोरसे, दिपक खरे, दिपक पवार, संभाजी चौधरी, चंद्रकांत पाटील, रमेश शेळके, अतुल कोळी, मनोज भोसंडे, सुनिल क्षिरसागर , श्रीराम कलाल, रमेश लिंगायत, श्रीकृष्ण भिवसने, प्रवीण चौधरी यासह युवा वर्ग व ग्रामस्थांनी केले.