बोदवड । बोदवड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड न्यायालयात फिरते विधी सेवा केंद्र , लोकअदालत आयोजन करण्यात आले. सर्वोच न्यायालयाच्या “न्याय आपल्या दारी (justice at door) या संकल्पनेनुसार बोदवडला गांधीचौक, पोलिस स्टेशन व नडगाव रेल्वे स्टेशन येथे फिरते विधी सेवा केंद्र , लोकअदालत शिबीर आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जलद न्यायासाठीच लोकअदालतीचा गरजुंनी लाभ घ्यावा, असे अवाहन ॲड.अर्जुन टी. पाटील यांनी केले.
बोदवड येथील न्यायालयात फिरते विधी सेवा केंद्र या द्वारा लोकअदालतीचे तसेच मोफत कायदेविषयक सल्ला शिबीर घेण्यात आले.यावेळी महिला व बालक, जेष्ठ नागरिक यांचे हक्क व कायदे याबाबत उपस्थितांना ॲड. अर्जुन टी. पाटील, यांनी मार्गदर्शन केले. न्यायधीश क्यू.ए.एन. सरवरी अध्यक्षस्थानी होते. फिरते विधी सेवा केंद्रद्वारा आयोजित लोकअदालतीत एकुण 24 प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
व्यासपीठावर बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष व पंच म्हणुन ॲड. अर्जुन टी. पाटील, ॲड.के. एस. इंगळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर पक्षकार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. फिरत्यामोबाईल व्हॅन न्यायालयामाफर्त पक्षकाराच्या केसेसचा ताबडतोब निपटरा झाल्यामुळे पक्षकारानी समाधान व्यक्त केले.
तसेच सदर कार्यक्रमास यशस्वितेसाठी तसेच फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालती मंध्ये ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड. किशोर ए महाजन ए , ॲड. मीनल अग्रवाल , सरकारी वकील डी.बी. वळवी , ॲड. किशोर्सिंग एस. राजपूत भुसावळ बोदवड तालुक वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
ॲड.अमोलसिंग पाटील, ॲड.किशोर महाजन,न्यायालयीन अधिक्षक वैभव तरटे,विधी प्राधिकरण समन्वयक अविनाश राठोड, प्रशांतकुमार बेदरकार, स्टेनो राहुल साबळे ,तर पोलिस निरीक्षक अरविंद भोळे,पोलिस सह निरीक्षक सुजीत पाटील पो.कॉ. आर.डी.महाजन, यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. बोदवड तालुका वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी वर्ग व बिलीफ,यांनी उपस्थिती देवुन कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम केले.