लोकसभा २०२४ : गिरीश महाजनांकडे मोठी जबाबदारी

मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीत विजयी पताका फडकविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत भाजपनं लढविलेल्या २५ पैकी २३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. या सगळ्या मतदारसंघांसाठी भाजपनं निरीक्षकांची घोषणा केली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी दोन निरीक्षक नेमण्यात आले आहेत. या पदांसाठी भाजपनं विद्यमान आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे.

स्थानिक लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी निरिक्षकांवर असेल. स्थानिक आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासोबत निरीक्षक संवाद साधतील आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना देतील. या माहितीचा उमेदवारी देताना केला जाईल. दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं नाव रावेर लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहे. भाजपनं महाजन यांच्याकडे ईशान्य लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपच्या निरीक्षकांची पूर्ण यादी

भिवंडी- योगेश सागर, गणेश नाईक
धुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदे
नंदरुबार- संजय भेगडे, अशोक उके
जळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहेर
रावेर- हंसराज अहिर, संजय कुटे
अहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदे
जालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंह
नांदेड- जयकुमार रावल, सुभाष देशमुख
बीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईक
लातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळ
माढा- भागवत कराड, प्रसाद लाड
सांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील
नागपूर- मनोज कोटक, अमर साबळे
भंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघ
गडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटील
वर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटील
अकोला- संभाजी पाटील, विजय चौधरी
दिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकर
उत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकर
उत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरे
उत्तर मध्य मुंबई- धनंजय महाडिक, राजेश पांडे