मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतुन एनडीए आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. सर्वेक्षणात इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडीला मिळणाऱ्या अंदाजे जागांची आकडेवारी समोर आली आहे.
या सर्वेक्षणानुसार, एनडीए आघाडीला 295 ते 335 जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला 165 ते 205 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरांना 35 ते 65 जागा मिळू शकतात. उत्तर भारतातील 180 जागांपैकी एनडीएला 150 ते 169 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर, इंडिया आघाडीला येथे केवळ 20 ते 30 जागा मिळु शकतील. याशिवाय इतरांना 0 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातील 132 जागांपैकी एनडीएला केवळ 20 ते 30 मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया आघाडीला 70 ते 80 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर इतरांना 25 ते 35 जागा मिळतील असा अंदाज आहे. पूर्व भारतात 130 जागांपैकी एनडीएला 80 ते 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे. इंडिया आघाडीला 50 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना येथे 10 ते 20 जागा मिळू शकतात.
पश्चिम भारतात लोकसभेच्या 78 जागांपैकी एनडीएला 45 ते 55 जागा मिळतील, इंडिया आघाडीला 70 ते 80 जागा मिळू शकतात. तर इतरांना 0 ते 5 जागा मिळतील. असं सर्व्हेक्षणातुन समोर आले आहे.