Lok Sabha election 2024 : चीन AI द्वारे लोकसभा निवडणुकीमध्ये करू शकतो फेरफार

xr:d:DAFe8DR0y38:2526,j:8278040129273811407,t:24040611

Lok Sabha election 2024  :   चीन  कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) तयार केलेल्या कंटेंटचा वापर भारतातील लोकसभा निवडणुकांदरम्यान फेरफार करण्यासाठी करू शकतो, असा धोक्याचा इशारा मायक्रोसॉफ्टने  दिला आहे.

 

चीन सरकारचा सायबर ग्रुप  त्याच्या हितसंबंधांसाठी AI-जनरेटेड कंटेंट तयार करेल आणि त्याचा गैरवापर करु शकतो. निवडणूक निकालांवर अशा कंटेंटचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. पण मीम्स, व्हिडिओज आणि ऑडिओ कंटेंट वाढवण्याचा चीनचा प्रयोग सुरुच राहील आणि तो अधिक प्रभावी ठरू शकतो.” असेही मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

 

देशातील लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. ही निवडणूक १९ एप्रिलपासून सुरू होणार असून ती १ जूनपर्यंत चालणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.

 

चिनी सायबर ग्रुप फ्लॅक्स टायफून हा वारंवार दूरसंचार क्षेत्रावर हल्ला करतो. त्याने २०२३ च्या सुरुवातीला आणि हिवाळ्यात भारत, फिलीपिन्स, हाँगकाँग आणि अमेरिकेला टार्गेट केले होते. फेब्रुवारीमध्ये एका चिनी हॅकर ग्रुपने पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालय आणि रिलायन्स आणि एअर इंडिया सारख्या व्यवसायांसह भारत सरकारच्या प्रमुख कार्यालयांना टार्गेट केल्याचा दावा केला होता.