Lok Sabha Election Result : एनडीएने बहुमताचा आकडा गाठला; इंडिया आघाडी पिछाडीवर

Lok Sabha Election Result : देशातील लोकसभा निवडणुकीचे कल समोर येत आहेत. यात एनडीएने बहुमताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडी पिछाडीवर आहे.

एनडीएने २८८ जागांवर तर इंडिया आघाडी १३२ जागांवर आघाडी घेतली आहेत. त्यामुळे एनडीएने बहुमताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडी पिछाडीवर आहे.

थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मतदार महायुतीच्या उमेदवारांच्या विकास कामांच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करणार ? की, महाविकास आघाडीच्या ‘संविधान बचाओ’ नाऱ्याला कौल देणार ? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.