Lok Sabha Election Result : नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी ५० हजार मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election Result : नंदुरबारमधून महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड. गोवाल पाडवी हे आघाडीवर आहे तर महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित या पिछाडीवर आहे.

नंदुरबारमधून ऍड. गोवाल पाडवी हे तब्बल ५० हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर डॉ. हिना गावीत या पिछाडीवर आहेत. त्यामुळे नंदुरबारमध्ये धक्कादायक निकाल लागणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मतदार महायुतीच्या उमेदवारांच्या विकास कामांच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करणार ? की, महाविकास आघाडीच्या ‘संविधान बचाओ’ नाऱ्याला कौल देणार ? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.