Lok Sabha Election Results : नंदुरबारमधून डॉ. हिना गावित आघाडीवर, राज्यात भाजप सहा जागांवर आघाडीवर

Lok Sabha Election Results :  मतमोजणीला सुरुवात झाली असून, नंदुरबारमध्ये भाजप उमेदवार डॉ. हिना गावित, बारामतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, उत्तर मुंबईमधून पियुष गोयल व नागपूरमधून नितीन गडकरी आघाडीवर असल्याची समोर आली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मतदार महायुतीच्या उमेदवारांच्या विकास कामांच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करणार ? की, महाविकास आघाडीच्या ‘संविधान बचाओ’ नाऱ्याला कौल देणार ? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.