Nandurbar Lok Sabha : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.
नंदुरबार लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र जवळपास १२ (१९६७ ते २००९) वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच २०१४ साली भाजपकडे गेली. कधीकाळी हा मतदारसंघ स्व.माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मोदी लाटेत डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच नंदुरबार लोकसभेत लढत होते. मात्र यावेळी बिरसा फायटर्सकडूनही (आदिवासी संघटना) लोकसभेसाठी तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे.
दरम्यान, नंदूरबार लोकसभा मतदारसंघात तुमचे मत कोणाला, म्हणून स्ट्राय पोलवर दि. ५ मार्च २०२४ रोजी सोशल मिडीयावर सुमारे ५०० पेक्षा अधिक वाॅटसप ग्रूपवर ही मतदानाची लिंक टाकण्यात आली. त्यात बिरसा फायटर्स संघटनेचे अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, काँग्रेसचे आ.के.सी.पाडवी, भाजप खा. डॉ. हिना गावित व इतर असे पर्याय ठेवण्यात आले. यात बिरसा फायटर्स संघटनेचे अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे जिंकले आहेत. ११ तासापूर्वी मतमोजणी केली असता एकूण १७१४ मतदारांनी मतदान केले.
सुशिलकुमार पावरा यांना ६७५ मते पडली तर काँग्रेसचे आ.के.सी.पाडवी यांना ५०८ मते पडली, भाजपच्या खा.डॉ. हिना गावित यांना ३०० मते पडली आहेत. या तिघांव्यतिरिक्त इतर उमेदवारांना २३१ मते पडली. मात्र हे स्ट्राय पोल जरी असले तरी मतदारांची कुणाला पसंती आहेत यातुन स्पष्ट होत आहे. दरम्यान, नंदुरबार लोकसभेवर कोण बाजी मारणार ? हे निवडणूक झाल्यावरच कळेल.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत बिरसा फायटर्स उमेदवारांनी पक्षांच्या उमेदवारांना धक्का देत २६ ग्रामपंचायतची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे हा पोलींग वोटचा निकाल सुद्धा काँग्रेस, भाजप उमेदवारांना धक्का देणारा का ? असा अंदाज देणारा ठरला आहे.