Lok Sabha elections : महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. डाव्या पक्षांनाही बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उद्याच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. यात काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल. आतापर्यंत ३० जागांचं वाटप झालं असल्याची माहिती मिळत आहे. त्यात जो पक्ष जागा जिंकून येतो ती जागा त्या पक्षाला असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळत आहेत.
उरलेल्या १८ जागांवर चर्चा अपेक्षित आहे. ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता आहे.