Lok Sabha elections : १५ मार्च नंतर आचारसंहिता ?

Lok Sabha elections : १५ मार्च नंतर लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोग सोमवार ते बुधवार जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. या दरम्यान केंद्रशासित प्रदेशात निवडणुका कधी घेतल्या जाऊ शकतात, याबाबत निर्णय होऊ शातो.

गुरुवारी किंवा शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. या केंद्रशासित प्रदेशात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होऊ शकतात, असे बोलले जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने शुक्रवारी गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांशी या विषयावर बैठका घेतल्या. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसह जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याच्या शक्यतेवर निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. अशातच येथे लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होऊ शकतात.