लोकसभा अध्यत्रपदाची निवडणूक भाजपचे ओम बिर्ला यांनी जिंकली आहे. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला आहे.
लोकसभा अध्यत्रपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए विरूद्ध इंडिया आघाडी अशी ही निवडणूक पार पडली. एनडीकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून कोडीकुन्निल सुरेश यांच्यात ही लढत झाली. या निवडणुकीत भाजपचे ओम बिर्ला यांनी बाजी मारली. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला आहे.
ओम बिर्ला राजस्थानच्या कोटा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर कोडीकुन्निल सुरेश हे केरळच्या मवेलीकारा या मतदारसंघातून आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 18 व्या लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला.
लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्यावाची शपथ देण्यात आली. सोबतच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस उमेदवार के सुरेश रिंगणात होते. आज स्पीकरची निवड होईल. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण भाजपाकडून सलग दुसऱ्यांदा एकाच व्यक्तीची स्पीकरपदी निवड होण्याची ही पहिली वेळ आहे.
INDIA आघाडीचे उमेदवार के. सुरेश केरळच्या मवेलीकाराचे प्रतिनिधीत्व करतात. ते 8 वेळा खासदार म्हणून निवडून लोकसभेवर गेले आहेत. या निवडणुकीत त्यांचा मार्ग सोपा नव्हता. 543 सदस्यांच्या लोकसभेत सध्या 542 खासदार आहेत.
राहुल गांधी यांनी वायनाडमधून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही सीट खाली आहे. लोकसभेत 293 खासदार असलेल्या NDA कडे स्पष्ट बहुमत आहे. INDIA आघाडीकडे 236 खासदारांच संख्याबळ आहे. अपक्षासह अन्य एकूण 13 खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 271 मतांची आवश्यकता आहे.