Loksabha Election 2024 : जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी; भाजपची दुसरी यादी जाहीर

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील २० नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. जळगावमधून श्रीमती स्मिता वाघ तर  रावेतमधून रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

यांच्यासोबत पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव चिखलिकर, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश आहे.

डिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील, मुंबई उत्तरमधून पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बीडमधून पंकजा मुंडे, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे.