Loksabha Election 2024 : नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा संधी; भाजपची दुसरी यादी जाहीर

नंदुरबार : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील वीस नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ यांच्यासह धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेतमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव चिखलिकर, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश आहे. डिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील, मुंबई उत्तरमधून पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बीडमधून पंकजा मुंडे, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे.