गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दिड लाखांची लूट ; सावद्यात खळबळ

---Advertisement---

 

सावदा, प्रतिनिधी : रावेर तालुक्यात भर दिवसा गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दोन दुचाकी स्वारांकडून दिड लाखांची रोकड लुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, या घटनेचे सावट भविष्यात शहरात सर्वसामान्य, व्यापारी व उद्योजकांच्या दिशेने येवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पोलीस सूत्रानुसार, सावदा ते पिंपरुळ मार्गने दुचाकीवर भुसावळ येथे जाणाऱ्या साजीद शेख अकबर व त्याचा मित्र ब्बलू खान अय्युब खान यांना एका टवेरा कारमधून आलेले अज्जू डॉन बुऱ्हानपूर वाला व तौफिक (पुर्ण नाव माहीत नाही) सह त्याचे अन्य साथीदारांनी भरदिवसा गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली टायरांची १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लूटली.

या प्रकरणी साजीद शेख अकबर,रा.मुस्लिम कालोनी, भुसावळ यांच्या फिर्यादीवरून गुरनं.२११/२०२५ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम-३१०(२),३११,११५(२)३५१(२)(३),३५२ सह शस्त्र अधिनियम सन १९५९ चे कलम ३/२५ अन्वये सावदा पोलिस ठाण्यात बऱ्हाणपूरचा कुख्यात गुंड अज्जू डॉनसह त्याचे अन्य साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना फैजपूर रोडावर दक्षिण दिशेकडे असलेल्या ट्रान्सपोर्ट केळी गोडाऊनच्या मागे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर घडली. दरम्यान, संशयितांना पोलीसांनी येथूनच मुद्देमालासह ताब्यात घेतले, अशी माहिती समोर येत आहे.

डॉनच्या प्रवेश अन् जुगार खेळणारे भयावह परिस्थितीत पळाले

डॉनच्या प्रवेशामुळे जुगार खेळणारे भयावह परिस्थितीत सैरावैरा पळाले. दरम्यान, या घटनेमुळे एकीकडे घटनास्थळी असलेल्या चहू बाजूचे व्यवसायिक कमालीचे धस्तवल्याचे बोलले जात आहे. तसेच अशा लुटीच्या घटनेचे सावट भविष्यात शहरात सर्वसामान्य, व्यापारी व उद्योजकांच्या दिशेने येवू शकते अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

लुटीची घटना व घटनास्थळात बदल

तर दुसरीकडे या लुटीच्या संदर्भात प्रकाशीत वृत्तमध्ये थेट लुटीची घटना व घटनास्थळात बदल बघून सर्वसामान्य जनता, सुज्ञ नागरीक सह (जुगार) या व्यवसायाशी निगडीत असलेल्या लोकांमध्ये अश्चार्य व्यक्त केले जात असून, या गोष्टीला घेऊन सध्या संपूर्ण तालुक्यात उलटसुलट चर्चेला एकच उधाण आले आहे. तसेच लुटीचे ठिकाण बदलविण्यामागे व अवैध जुगार व्यववसाय व व्यवसायिक यांना वाचविण्याचा हा प्रयत्न आहे का अशी देखील चर्चा नागरिकांत होत आहे.

वास्तविक ही लुटीची घटना फैजपूर रोडावरील जुगार अड्ड्यावर घडली की, सावदा ते पिंपरूळ रस्त्यावर स्मशान भूमी जवळ याबाबत सखोलपणे चौकशी व्हावी, अशी लेखी तक्रार पुराव्यानिशी वरिष्ठ स्तरावर काही सुज्ञ नागरिक करणार असल्याचे समजते व कळते तरी देखील सदर प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून देखील चौकशी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून देखील व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---