तरुण भारत लाईव्ह । २३ मे २०२३। शनीदेव हे कलियुगातील न्यायाधिकारी म्हणून ओळखले जातात. शनीची वक्र दृष्टी राजाचा रंक तर शनीचा आशीर्वाद हा रंकाचा राजा बनवू शकतो असा भक्तांचा विश्वास आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १७ जून २०२३ ला रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी शनी वक्री होणार आहेत तर ४ नीव्हेम्बर २०२३ ला सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत शनीदेव उगाच स्थितीत असणार आहेत. अशा काही राशी आहेत ज्यांना प्रचंड धनलाभासह विशेष प्रगतीची संधी चालून येणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
शनी वक्री मेष राशीच्या मंडळींना प्रचंड मोठा लाभ मिळवून देणार आहे अशी चिन्हे आहेत. येत्या काळात तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला धनलाभाची संधी आहे.
वृषभ रास
वृषभ राशीला अप्रत्यक्ष धनलाभाचे योग आहेत. गुंतवणुकीचा योग आहे. तुम्हाला निर्णय घेऊन तुमच्या लाभावर शिक्कामोर्तब करता येईल. आयुष्यात समृद्ध करणारा एक काळ अनुभवता येऊ शकतो.
मिथुन रास
मिथुन राशीला शनीच्या उलट्या पावली चालण्याचा मोठा फायदा होऊ शकतो. आपली अडकून पडलेली कामे मार्गी लागल्याने अडकून पडलेले धन सुद्धा प्राप्त होऊ शकते.
सिंह रास
शनीच्या प्रवासात सिंह राशीच्या मंडळींना लॉटरी प्रमाणे अनपेक्षित व अचानक धनलाभ होण्याची संधी आहे. एखाद्या नव्या व्यवसायाची संधी येऊ शकते. तसेच तुमचे प्लॅन प्रत्यक्ष साकारण्यासाठी हा फायद्याचा काळ ठरू शकतो.
मकर रास
मकर राशीचे मूळ स्वामीच शनीदेव आहेत. त्यामुळे शनीच्या कोणत्याही चालीमुळे आपल्या राशीला फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीमधील गुंतवणूक आपल्याला लाभदायक ठरू शकते.