---Advertisement---
नगर : पारनेर तालुक्यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी भीमा नदीपात्रात उडी मारुन आयुष्य संपवलं होतं. या घटनेनेने राज्यभरात खळबळ उडालेली. याप्रकरणी आता आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे.
---Advertisement---
मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये १७ जानेवारी रोजी एकाच कुटुंबातील सात जणांनी भीमा नदीपात्रात उडी मारुन आयुष्य संपवलं होतं.
काय कारण आलं समोर?
या आत्महत्येचं कारण प्रेम प्रकरण असल्याचं समोर आलेलं आहे. मुलाने युवतीला पळवून नेले म्हणून मुलाच्या वडिलांसह घरच्यांनी आत्महत्या केली.
मुलाने युवतीला पळवून नेल्याचं शल्य वडिलांच्या मनामध्ये होतं. ते वारंवार मुलीला परत आण म्हणून सांगत होते. मात्र मुलगा ऐकत नव्हता.
शेवटी वडिलांनी दुसऱ्या मुलाला फोन करुन निर्वानिचा इशारा दिला होता. एक तर मुलगी परत आणायला सांग नाही तर आम्ही विष घेतो किंवा पाण्यात जीव देतो, असं ते म्हणालेले.
तरीही मुलाने ऐकलं नव्हतं. त्यामुळे १७ जानेवारी रोजी भीमा नदीपात्रात मुलाचे आई, वडील, बहीण, जावई, बहिणीचे तीन मुलं यांनी आत्महत्या केली. नगरच्या पारनेर तालुक्यात ही घटना घडली होती. आज या सात जणांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे.