प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न, प्रेयसी भडकली अन्.., पुढे घडलं ते धक्कादायकच

crime news :  प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्न होत असल्याचे ऐकून धक्क्याने खचून गेलेल्या तरुणीने धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसी तरुणीनं थेट लग्न मंडप गाठत प्रियकरासह नवरीच्या अंगावर ॲसिड फेकले. यामध्ये तब्ब्ल प्रियकरासह १२ लोकं जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुत्रानुसार, छत्तीसगढ येथे १९ एप्रिल रोजी ही भयंकर घटना घडली आहे. आपल्या प्रियकराचे दुसऱ्या मुलीशी लग्न होत असल्याने प्रेयसीला राग अनावर होऊन तिने हे कृत्य केलं आहे. गेल्या १० वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. तरुणीने त्याला अनेक वेळा लग्नासाठी विचारले मा,त्र त्याने कायम तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. अशात आता तो तिला अंधारात ठेऊन लग्न करत होता.

जेव्हा प्रेयसीला आपल्या प्रियकराचा खरा चेहरा समजला तेव्हा तिला मोठा धक्का बसला. या धक्क्याने ती खचून गेली. ज्याच्यावर इतकी वर्षे जिवापाड प्रेम केलं त्यानेच धोका दिला त्यामुळे तरुणीने याचा बदला घेण्याचं ठरवलं. तिने थेट ॲसिडची बाटली घेऊन लग्नमंडपात धाव घेतली आणि प्रियकर तसेच नवरीच्या अंगावर ॲसिड फेकले.

तरुणीने जेव्हा प्रियकरावर ॲसिड फेकले तेव्हा तिथे उपस्थित इतर व्यक्तींवर देखील हे ॲसिड पडले. या घटनेत प्रियकरासह तब्बल १२ लोकं जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेत २३ एप्रिल रोजी पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतले. त्यानतंर तिच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरुणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.