LPG सिलेंडरच्या किमती वाढवल्या ; नवे दर आजपासून लागू

मुंबई । दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर अपडेट केले जातात. त्यानुसार सरकारी तेल कंपन्या म्हणजेच OMCs यांनी दिलेल्या महितीनुसार, LPG गॅस सिलिंडरच्या दरांत बदल झाला आहे. सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेला बदल व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी आहे. त्यामुळे 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 6.5 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. बदल झालेले हे नवे दर आज 1 ऑगस्ट 2024 पासूनच सुरू होत आहेत. दुसरीकडे घरगुती वापरात असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत.मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडर महागल्याने हॉटेल, रेस्टॉरंट येथील जेवणाच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. 1 जुलै रोजी 19 किलोग्रॅमचे सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाले होते याच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. किंमती कमी केल्यानंतर आता पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत. नवे दर असे? आजपासून मुंबईत १९ किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६०५ रुपये झाली आहे.पूर्वी हे दर १५९८ रुपये होते. तर घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. तर त्यात ७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.