---Advertisement---

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पाठोपाठ एलपीजीसह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर दरातही वाढ

---Advertisement---

LPG Price Hike :  पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला ​​आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने एलपीजीसह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरच्या दरातही वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार असून, एलपीजीच्या दरात नेमकी किती वाढ होणार आहे? हे जाणून घेऊया…

केंद्र सरकारने उद्या मंगळवार, ८ रोजीपासून एलपीजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही घोषणा केलीय. मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या घोषणेनुसार, उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरसह एलपीजीची किंमत ५० रूपयांनी वाढली आहे.

उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणारे सिलेंडर आता ५०० रूपयांऐवजी ५५० रूपयांना मिळणार आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडर ८०३ रूपयांऐवजी आता ८५३ रूपयांना मिळणार आहे. सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

सामान्य माणसावर काय परिणाम होईल?

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात उद्या मंगळवार, ८ रोजीपासून वाढ होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांसह गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरसह एलपीजीची किंमत ५० रूपयांनी वाढली आहे.

त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणारे सिलेंडर आता ५०० रूपयांऐवजी ५५० रूपयांना मिळणार आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडर ८०३ रूपयांऐवजी आता ८५३ रूपयांना मिळणार आहे. सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment