LPG Cylinder : डिसेंबर महिन्यातही गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलींडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाहीय. आता एक डिंसेबरपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे जाणून घेऊया…
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग पाचव्या महिन्यात वाढ झाली आहे. तर, मार्च २०२४ पासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. मात्र, मागील पाच महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.
दिल्लीत आज 1 डिसेंबरपासून 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1818.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात 16.50 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत आजपासून गॅस सिलिंडर १७७१ रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत १९८०.५० रुपये झाली आहे.
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.
मुंबईमध्ये १९ किलो वजनाचा व्यवसायिक गॅस सिलेंडर १७५४ रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता १७७१ रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये १८१८.५०, कोलकात्यामध्ये १९८०.५० रुपयांना सिलिंडर मिळेल. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.