LPG सिलेंडर पुन्हा महागला; किती रुपयांनी वाढले दर? पहा

मुंबई । दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला जातो. त्यानुसार आज १ नोव्हेंबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

शुक्रवारी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ करण्यात आली. यानंतर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये झाली. सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत.

सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मार्चपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. पण मागील चार महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत आहे.