---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील पशुधनावर लम्पी आजाराचे संकट, शिरसोलीत गोह्याचा मृत्यू

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : शिरसोली येथे शंकर लक्ष्मण बारी यांच्या एका चार वर्षीय गोह्याचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, लम्पी साथीच्या काळात जि. प पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे कंपाऊंडरच्या सहाय्याने उपचार करावे लागत आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिरसोली प्र. बो. आणि प्र. न. दोन्ही गावांमध्ये पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतु येथे अनेकदा डॉक्टर नसतात. तसेच दुपारी बारानंतर हा दवाखाना नेहमीच बंद असतो. त्यामुळे अनेक वेळा पशुपालकांना आपल्या गुरांवर खाजगी डॉक्टरांकडून उपचार करावे लागतात.

जिल्ह्यातील पशुधनावर लम्पी आजाराचे संकट

जळगाव : जिल्ह्यात सध्या लम्पी या संसर्गजन्य आजाराने पशुधनावर घाला घातला आहे. शेतीच्या कामांचा मोसम सुरू असताना जनावरांमध्ये या आजाराचा फैलाव होऊ लागल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.

गत दोन महिन्यांपासून बोदवड तालुक्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरण केवळ कागदोपत्री झाले असल्याची चर्चा असून, प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसून येत आहे. बोदवड शहरातील ललित सारवान यांच्या दीड वर्षाच्या वासराला लम्पीची लागण झाली होती. त्याच्या अंगावर पुरळ उठल्या आणि उपचार सुरू असतानाच ते दगावले. दुसरीकडे करंजी शिवारात पाच जनावरांना लम्पीची लागण झाली असून, यात गायी, म्हशी, बैल यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---