लुसलुशीत रसगुल्ले रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २९ ऑगस्ट २०२३। बऱ्याच लोकांना गोड खायला आवडत. पण नेहमीच गोड आणायला बाजारात जावं लागत, त्यापेक्षा रसगुल्ला हा गोड पदार्थ तुम्ही घरीच बनवून खाऊ शकता. रसगुल्ला हा घरी करून पहायला खूप सोप्पा आहे. रसगुल्ला घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
दूध, व्हिनेगर, पनीर, पाणी, साखर,कॉर्नफ्लॉवर.

कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात दूध घेऊन ते उकळवा त्यानंतर ते दूध आठवण्यासाठी व्हिनेगर त्यावर वापरा. दूध आटून झाल्यावर या मिश्रणाला थोडे शिजायला ठेवा. यानंतर एका गाळणीने आटवलेल्या दुधातील पाणी गाळून घ्या. गाळून राहिलेल्या दूधाच्या मिश्रणात तीन वेळा पाणी घालून चांगले ढवळून आणि गाळून घ्या. आता पनीरच्या गोळ्यातून जास्त झालेले पाणी काढून टाकण्यासाठी एक सुती कापड घेऊन यामध्ये हा पनीरचा गोळा कपड्यात बांधून पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत १५ ते २० मिनिटे बाजूला काढून ठेवा.

पाक बनविण्यासाठी दुसऱ्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये साखर घालून पाणी उकळवा. यानंतर सुती कापड मध्ये बांधून ठेवलेला पनीरचा गोळा काढून घेऊन या मिश्रणात कॉर्नफ्लॉवर घाला त्याचे गोल गोळे बनवून घ्या. जितकं जास्त ते पीठ आपण मळवून घेऊ तितकेच रसगुल्ले नरम होतील. आता तयार केलेले गोळे साखरेच्या पाकात घाला. तयार आहेत लुसलुशीत रसगुल्ले.