गीतकार ‘देव कोहली’ यांचं निधन; वयाच्या ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तरुण भारत लाईव्ह । २६ ऑगस्ट २०२३। बॉलीवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गीतकार देव कोहली यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २ महिन्यांपासून वयाच्या आजारामुळे अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचं शनिवारी पहाटे ४ वाजता झोपेतच निधन झाले. देव कोहली यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

देव कोहली यांनी अभिनेता सलमान खान याच्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमासाठी कबूतर जा जा, आजा शाम होने आई, आते-जाते हंसते गाते, कहे तोसे सजन, हम आपके हैं कौन, बाजीगर, जुड़वा 2, मुसाफिर, हि गाणी लिहिली.. देव कोहली यांनी लिहिलेल्या गाण्यांमुळे बॉलिवूडला एक वेगळी दिशा मिळाली होती.

देव कोहली यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या लोखंडवाला येथील घरी दुपारी २ वाजल्यापासून ठेवण्यात येणार आहे. तर आज मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.