Dhule News : कांदा निर्यात धोरणाविरुद्ध महाविकास आघाडी रस्त्यावर, महामार्गावर वाहतूक कोंडी

Dhule News : कांदा निर्यात धोरणा विरोधामध्ये महाविकास आघाडीचे तीनही पक्ष आक्रमक झाले. आज धुळे- सुरत महामार्गावरील शेवाळी फाटा या ठिकाणी या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

कांद्याच्या निर्यातीवर लावलेला ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात यावा; अशी मागणी या रास्ता रोको करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे. रस्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी देखील सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. यावेळी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचा आरोप देखील लावला आहे.

कांदा निर्यात धोरणा विरोधामध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलकांनी रास्ता अडवून धरल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे बघावयास मिळाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील यावेळी लागल्याच्या बघावयास मिळाल्या आहेत.