नंदनगरीत साडेपाच दशकापूर्वीच्या विठ्ठल मंदिरात महाआरती, भाविकांचा उत्साह

नंदुरबार : शहरातील देसाईपुरा, कुंभार गल्ली भागातील बुवा महाराज यांच्या सुमारे साडेपाच शतक अर्थात साडेपाचशे वर्षांपूर्वीचे पुरातन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाआरती करण्यात आली. यजमान जोडप्यांसह महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर होती उपस्थिती.

आषाढी एकादशीनिमित्त बुवा महाराजांच्या विठ्ठल मंदिरास आकर्षक फुगे आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आले. फुलमाळांची सजावट देखणी ठरली.

विठुरायाला विविध आभूषणांनी सजविण्यात आले. सकाळ पासून भाविकांचा उत्साह दिसून आला. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विठुरायाची महाआरती करण्यात आली. विठ्ठल नामाच्या गजरात भावीक तल्लीन होऊन गेले. यावेळी विविध भक्ती गीतांसह भजन कीर्तन करण्यात आले.

महाआरती नंतर आषाढी एकादशी निमित्त परिसरातील भाविकांना साबुदाणा खिचडी अर्थात फराळाचे वाटप करण्यात आले. येत्या काळात महिन्यातील दोन्ही एकादशीला येथील विठ्ठल मंदिरात पहाटेची काकड आरती करण्याचा मानस भाविकांनी व्यक्त केला.