श्री सिद्धी महागणपतीला दोन लाख मोदकांचा महाभिषेक 

जळगाव : श्री सिद्धी वेंकटेश देवस्थान जळगावच्यावतीने पाळधी येथे ७ ते २२ फेब्रुवारीदरम्यान श्री सिद्धी महागणपती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवार रोजी चतुर्थीनिमित्त श्री सिद्धी महागणपतीला दोन लाख मोदकांचा महाभिषेक करण्यात आला, असे मदनगंश किशनगड पहिले नेपाळ, विष्णू मंदिराचे प्रधाना आर्चक व आजच्या कार्यक्रमाचे पुजारी देवनायकाचार्य देवीलाल शास्त्री यांनी सांगितले.

तसेच भारतात एकमेव ही श्री सिद्धी महागणपतीची मूर्ती आहे. मंदिराचे विश्वस्त श्रीकांत मणियार यांना असे वेगळे करायचे होते जे भारतात आजपर्यंत कुणीही केलेले नाही. त्यांच्या या संकल्पनेतून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ही मूर्ती दक्षिण भारतामध्ये तयार करण्यात आली असून या मूर्तीला बनवायला २ वर्षे लागली असल्याचे श्री. शास्त्री यांनी यावेळी सांगितले.

तसेच ही मूर्ती ५ हजार वर्षे राहील अशी कल्पना केली जात आहे. या गणपतीच्या दर्शनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सगळ्याची प्राप्ती होते. या मूर्तीची स्थापना विश्वकल्याण, विश्वशांती या हेतूने करण्यात आली आहे असेही श्री. शास्त्री यांनी सांगितले. तसेच सर्व भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, गुरुवार रोजी दोन लाख मोदकांचा महाभिषेक, हवन आहुती, वेद पठण, अथर्वशिष्य पठण हे कार्यक्रम झाले.

उद्या हे कार्यक्रम होणार! 
देव आराधना, मंडलो की नित्य आराधना, गो दोहन, पुष्पादिवास, पंच गव्य प्रोक्षण, पंच कलश स्नान, नित्य हवन, आरती हे कार्यक्रम  शुक्रवारी सकाळी ८ ते ६ वाजेपर्यंत होणार आहे.