---Advertisement---

Girish Mahajan : शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, महाकाय पुनर्भरण योजना अंतिम मंजुरीच्या मार्गावर

---Advertisement---

जळगाव : जळगावसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या महाकाय पुनर्भरण योजना प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यांनी नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक तरतुदीबाबत सविस्तर चर्चा केली. लवकरच या प्रकल्पाला मान्यता दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. विशेष म्हणजे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री यांनीही या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ

‘या’ भागातील शेतकऱ्यांना मोठा लाभ

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा तसेच विदर्भातील काही तालुके आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व खकनार या तालुक्यांना मोठा लाभ मिळणार आहे. एकूण ३,५७,७८८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, त्यामुळे दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

१९,२४४ कोटींचा प्रकल्प

या महाकाय प्रकल्पासाठी सुमारे १९,२४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर पाणी पुनर्भरण व सिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासणार नाही आणि शेती उत्पादनात मोठी वाढ होईल.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही राज्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment