Mahant Priyaranjan Das Acharya : कबीर पंथी धार्मिक कार्यक्रम आटोपून परतले अन् काळाने केला घात, महंत यांचा जागीच अंत

---Advertisement---

 

Mahant Priyaranjan Das Acharya : कबीर पंथी धार्मिक कार्यक्रम आटोपून परतले, दूचाकीवर बसून ते कबीर मठाकडे निघाले असता, त्यांच्यावर क्रूर काळाने घाला घातला. एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ ही घटना घडली असून, या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महंत प्रियरंजनदास आचार्य हे बंगळुरु येथील कबीर पंथी धार्मिक कार्यक्रम आटोपून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात परतण्यासाठी पिंपरी बुद्रुक फाट्यावर उतरले होते. त्यांना नेण्यासाठी प्रवीण नारायण पाटील हा तरुण दुचाकी घेऊन आला होता. महंत प्रियरंजनदास आचार्य दुचाकीवर बसले, तोच समोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात महंत हे जागीच गतप्राण झाले.

त्यांच्या या अपघाती निधनामुळे कबीर पंथी नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातात महंत प्रियरंजनदास यांचा मृत्यू झाल्याचे कळताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी समांतर रस्ते व उड्डाणपुलाची मागणी करत रास्ता रोको आंदोलन सुरु केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांंगा लागल्या होत्या.

यावेळी तहसीलदार प्रदिप पाटील, पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर एक तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

चार वर्षांपासून आचार्य म्हणून देत होते सेवा

महंत प्रियरंजनदास हे जवळपास गेल्या चार वर्षांपासून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून सेवा देत होते. मात्र, त्यांच्या या अपघाती निधनामुळे कबीर पंथी नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---