शिवरायांना अनोखी मानवंदना… भिंगाचा वापर न करता राईवर साकारली महाराजांची सूक्ष्म प्रतिकृती

पाचोरा : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मावळे देशातच नव्हे, जगभरात दिसून येतात. हे मावळे आपल्या विविध कलेच्या माध्यमातून महाराजांना  मानवंदना देत असतात. नाशिकमधील नवनिर्वाचीत सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी मोहरीवर कुठल्याही प्रकारचा भिंगाचा वापर न करता महाराजांची रंगीत प्रतिकृती साकारून महाराजांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली. यामुळे ऐश्वर्या औसरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येवला तालुक्यातील अनकुटे येथील विठ्ठल गायकवाड यांनी ही प्रतिकृती साकारली होती. बटन व धाग्यांचा वापर करत शिवरायाची प्रतिमा साकारण्याकरता गायकवाड यांना तीन वर्षे आठ महिन्यांचा कालावधी लागला होता. त्या पाठोपाठ डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तूवर कुठल्याही प्रकारचं भिंगाचा वापर न करता रंगीत चित्र काढणाऱ्या चित्रकार नाशिकमधूनच पुढे आल्याने नाशिक करांनी देखील सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांचे कौतुक होत आहेत. शिवाय शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त नाशिकमध्ये २ लाख ४१ हजार शर्टच्या बटनांचा वापर करून शिवरायांची अप्रतिम अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती.

जग भरातील एव्हढ्या सूक्ष्म वस्तू वर असलेलं हे पहिलच चित्र असल्याच सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी म्हटलं. विशेषतः त्यांनी महाराजांची अशी रंगीत प्रतिकृती कुठल्याही भिंगाचा वापर न करता काढून दाखविण्याचे एका प्रकारे आव्हान चित्रकला क्षेत्रात काम करणाऱ्यांना केल आहे. त्यामुळे आता औसरकर यांचे हे मोठं आव्हाहन कोण स्वीकारनार हे पाहणं देखिल अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

सूक्ष्म चित्रकार म्हणजे दैनंदिन जीवनातील आहारमधील लहाण्यात लहान वस्तूवर उदा : रवा, भगर मोहरी, तीळ, तांदूळ, मुंगदाळ, साबुदाणा, चणाडाळ व शेंगदाणा यांच्यावर रंगीत एखाद्या व्यक्तीचे, देव – देवितांचे, प्राण्यांचे व निसर्गाचे सूक्ष्म रंगीत चित्र साकारणाऱ्या कलेला सूक्ष्म चित्रकला असे म्हणतात. ही कला माझ्या अंगी लहानपणापासून आहे, त्या माध्यमातून ही कला सर्व जगाला कळावी, त्यासाठी मी विविध संस्थेचे रिकॉर्ड पूर्ण केले असून त्याची येत्या दिवसांत अधिकृत घोषणा विविध संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळवर आपणास बघायला मिळणार आहे. असे सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर (नाशिक) यांनी जळगाव ‘तरुण भारत’शी बोलतांना सांगितले.